लग्नाचे आमिष दाखवून युवतीला पळविले! बुलडाणा शहरातील घटना...

 

बुलडाणा(बुलढाणा लाइव वृत्तसेवा): लग्नाचे आमिष दाखवून युवतीला पळवून नेल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एका युवकाविरुद्ध तक्रार देण्यात आली.

यासंदर्भात मुलीच्या वडिलांनी शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार दिली. त्यानुसार गुरुवारी दिनांक १५ फेब्रुवारीला सकाळीच युवती घराबाहेर पडली. मात्र उशीर झाला तरी ती घरी परतली नाही. त्यामुळे युवतीच्या  आईने लगेचच तिच्या वडिलांना बोलावून घेतले. वडिलांनी परिसरात खूप वेळ शोध घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या बहिणीचा फोन आला. तेव्हा युवती एका युवकासह मलकापूर रोड वर दिसून आल्याचे त्यांना कळाले. पुढे शोध घेत ते चिखली बसस्थानकात आले असता त्यांना युवती एका युवकास दिसून आली. दोघांना घेऊन त्यांनी बुलडाणा शहर पोलीस स्टेशन गाठले. लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची तक्रार युवकाविरुद्ध देण्यात आली. पुढील तपास पीएसआय सोनुने करत आहेत.