जिल्हा हादरला; ३ दिवसांत तिसरा मर्डर! मोताळा तालुक्यात डॉक्टरच्या घरी दरोडा; डॉक्टरच्या बायकोचा खून! डॉक्टर गंभीर....! नववर्षात रक्ताचा सडा....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सभ्य आणि शांत जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्याची ओळख आता लोप पावते की काय अशी भीती निर्माण झालेली आहे. गतवर्षात बुलढाणा जिल्ह्यात ३२ पेक्षा अधिक मर्डर झाले होते..आता नवीन वर्षात या घटना अधिक वेगाने वाढत आहेत, गेल्या ३ दिवसांत जिल्ह्यात तिसरा मर्डर झाला आहे.. मोताळा तालुक्यात एका पशुवैद्यकीय डॉक्टरच्या घरी दरोडेखोरांनी दरोडा टाकला, यावेळी झालेल्या झटापटीत दरोडेखोरांनी डॉक्टरच्या पत्नीचा खून केला आहे. गंभीर जखमी डॉक्टर वर उपचार सुरू आहेत. मोताळा तालुक्यातील दाभाडी येथे आज १९ जानेवारीच्या पहाटे ही घटना उघडकीच आली आहे..

  प्राप्त माहितीनुसार मोताळा तालुक्यातील दाभाडी येथील पशुवैद्यकीय डॉक्टर गजानन टेकाळे यांच्या घरी मध्यरात्री दरोडा पडला. घरातील मालमत्तेची लूट करीत असताना दरोडेखोरांनी माधुरी टेकाळे यांचा बळी घेतला. घरात टेकाळे पती-पत्नी होते. त्यांची मुलगी सहलीला गेलेली होती. दरम्यान सकाळी पाच वाजता शेजारी राहणाऱ्या टेकाळे यांच्या भावाच्या पत्नी दूध आणण्यासाठी गेल्या असता त्यांना दोघे पती-पत्नी घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा तथा जिल्हा पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून श्वानपथक देखील पोहोचले आहे. दरोडेखोरांनी घरातील कपाट तोडून दागिने आणि कॅश रक्कम चोरून नेल्याचा अंदाज आहे. याच दरम्यान झालेल्या झटापटीत दरोडेखोरांनी माधुरी टेकाळे यांचा खून केला. गजानन टेकाळे गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर मलकापुरात उपचार सुरू आहेत.. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात हा तिसरा मर्डर आहे. दोन दिवसांपूर्वी मलकापुरात प्रेम प्रकरणातून एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. दुसरीकडे शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे पैशाच्या वादातून भावानेच भावाचा खून केला होता. आता मोताळा तालुक्यात पुन्हा एकदा एक मर्डर झाले आहे. गत आठवड्यात मलकापुरात एका किन्नराचा देखील खून करण्यात आला होता. दरम्यान जिल्हा पोलिसांना आता कायद्याचा वचक दाखवावा लागणार आहे, दाभाडी मर्डर प्रकरणातील आरोपींचा शोध पोलिसांना तातडीने घ्यावा लागणार आहे..