"सर कटी लाश" प्रकरण तापले! महिनाभरानंतर पुन्हा उकरला मृतदेह; कवटी घेतली ताब्यात..आता AI तंत्रज्ञानाची तपासात घेणार मदत! तिची ओळख पटवणाऱ्याला पोलीस देणार ५० हजार..
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हा पोलीस दलात जळगाव जामोदच्या राजुरा शिवारातील "सर कटी लाश" प्रकरण चांगलेच तापले आहे. बुलढाण्याच्या टीम एलसीबीने २६ एप्रिलला उघडकीस आलेल्या या धक्कादायक हत्याकांड्यानंतर त्या मृतदेहाची शिवानी कळमेकर अशी ओळख पटवत तिच्या वडील आणि भावाला खुनाच्या आरोपात अटक केली होती. लवकरात लवकर खुनाचा तपास लावल्याचे श्रेय देखील लाटण्यात आले होते.. मात्र तब्बल महिनाभरानंतर शिवानी कळमेकर स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.. तपासांती तिच्या वडील आणि भावाला सोडून द्यावे लागले.. मात्र खोट्या गुन्ह्याच्या आरोपात तब्बल महिनाभर बाप लेक न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा कारागृहात भोगत होते.. राज्यभर या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते..एसपी निलेश तांबे आणि कठोर ॲक्शन घेत एलसीबी पीआय, जळगाव जामोदचे पीआय आणि एलसीबीच्या तपास पथकाची नियंत्रण कक्षात रवानगी केली..दरम्यान आता या प्रकरणाचा तपास मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्याकडे देण्यात आलाय.. काल,३ जूनला पोलिसांनी हत्या झालेल्या त्या अज्ञात महिलेचा मृतदेह पुन्हा उकरला.. फॉरेन्सिक टीम कडून त्याची तपासणी करण्यात आली..आता फॉरेन्सिक पथकाने त्या अज्ञात मृतदेहाची कवटी ताब्यात घेतली आहे..