२१ वर्षीय तरुण उतावळा झाला! अल्पवयीन मुलीसोबत सगळं काही करून बसला! परिणाम समोर आल्यावर डोक्यावर हात; आता होणार जेलवारी... मेहकर तालुक्यातील घटना 

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका २१ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीला वासनेची शिकार बनवले. मुलीचे पोट दुखायला लागल्यानंतर तिला दवाखान्यात नेले, त्यावेळी तपासल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला. मुलगी प्रेग्नेंट निघाली....
  मेहकर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला त्रास होऊ लागल्याने तिला अकोल्यात उपचारासाठी नेण्यात आलं होतं. तपासणीअंती मुलगी प्रेग्नेंट असल्याचे समोर आले. यावेळी मुलीच्या कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला. मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर तिने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची आपबीती सांगितली..
पीडित मुलीने आई व पोलीस शिपाई आम्रपाली सरकटे यांच्यासमोर बयान दिले. त्यात स्पष्ट म्हटले की मेहकर येथील आरोपी जगदीश ढाकरके याने तिला घरी बोलावून वारंवार शारीरिक संबंध ठेवले. २०२४ च्या ऑगस्ट महिन्यापासून तर २०२५ च्या जानेवारीपर्यंत हा प्रकार सुरू होता असे पुढील अल्पवयीन मुलीने सांगितले.. प्रीतीने दिलेल्या बयानावरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे...