BIG BREAKING इसरुळ मध्ये तणाव! रेतीचे टिप्पर पेटवले....
Updated: Aug 19, 2024, 08:54 IST
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील इसरुळ येथे तणाव निर्माण झाला आहे. रेतीची वाहतूक करणारे टिप्पर पेटवून देण्यात आले आहे . काल रात्री ११:३० च्या सुमारास हा प्रकार समोर आला आहे.
युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर अवैध रेती वाहतुकी विरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेत होते. मात्र टिप्पर कुणी पेटवले? याबद्दलची माहिती अद्याप मिळाली नाही.