शिक्षकी पैशाला काळिमा! मेहकर तालुक्यातील लोणी गवळीत विपरीत घडलं! वर्गातल्या मुलींसोबत करायचा अश्लील वर्तन! मुलींना म्हणायचा, घरी सांगाल तर भातात विष टाकीन..

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिक्षक म्हणजे ज्ञानदानाचे काम करणारे.. देशासाठी नवीन पिढी घडवणारे..शिक्षकी पेशाबद्दल भारतीय समाजाला कायमच आदर राहिलाय..मात्र मेहकर तालुक्यातील लोणी गवळीत एका शिक्षकाने आपल्या पेशाला वर्तनाने काळिमा फासलाय.. जिल्हा परिषदेच्या शाळेचा हा नराधम शिक्षक वर्गातल्या मुलींसोबत अश्लील वर्तन करायचा.. तुम्ही जर घरी सांगितले तर तुमच्या भातात विष कालवून मारून टाकेल अशी धमकी द्यायचा..आता त्या शिक्षकाच्या पापाचा घडा भरला आहे.. पीडित मुलींच्या आई वडिलांनी डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार या नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
 अल्पवयीन मुली अंदाजेवय ५ ते ९ वर्षांच्या तिसऱ्या वर्गातील असून सदर अल्पवयीन मुलींनी आपल्या आई-वडिलांना सांगितल्यामुळे सदर प्रकरणाची वार्ता गावभर पसरली होती, मुलींच्या सांगण्यानुसार मुलींच्या आई-वडिलांनी डोणगांव पोस्टेमध्ये तक्रार दाखल केली, यावेळी तक्रारीत नमुद करण्यात आले आहे की, , ७ एप्रिल रोजी आमच्या मुलींनी सांगितले की, वर्गशिक्षक महादेव मानतोडे हे नेहमी मुलींसोबत अश्लिल वर्तन करून कोणाला सांगितले तर गाठ माझ्याशी आहे.
तुमच्या जेवनाच्या भातामध्ये विषटाकून मारून टाकील अशी धमकी देतात. घटनेचा जाब विचारण्यासाठी ८ एप्रिल रोजी आम्ही वर्गशिक्षकाकडे गेलो असता तो शिक्षक म्हणाला तुम्हाला काय करायचे ते करा, माझे कोणी वाकडं करु शकत नाही. असे एका मुलीच्या आईने डोणगाव पोस्टेला दिलेल्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्या रिपोर्टनुसार सदर शिक्षकावर कलम ७४,७५,७८,३५२ भान्यासं सहकलम ८,१२ बाललैंगीक अत्याचार अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर वर्गशिक्षक महादेव आत्माराम मानतोडे हा वाशिम जिल्हातील मंगळूरपीर तालुक्यातील रहिवासी असून तो मेहकर शहरात वास्तव्यास आहे.