हराळखेड शिवारात विहिरीत बुडून शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू...
Feb 3, 2026, 10:47 IST
मंगरुळ नवघरे (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : हराळखेड शिवारात विहिरीतील पाण्यात बुडून एका ५२ वर्षीय शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत शिक्षकाचे नाव किसन भगवान येवले (वय ५२) असे आहे. याबाबत नंदकिशोर येवले यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी रविवार असल्याने किसन येवले हे शेतामध्ये नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी गेले होते. मात्र, पहाटे सुमारे ५ वाजता त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला.
तक्रारीनुसार विहिरीत पडून पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
किसन येवले हे चिखली तालुक्यातील वैरागड येथील जिल्हा उच्च प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या पश्चात वडील, एक भाऊ, एक मुलगी, एक मुलगा तसेच मोठा येवले परिवार असा परिवार आहे.हराळखेड शिवारात विहिरीत बुडून शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू
मंगरुळ नवघरे :हराळखेड शिवारात विहिरीतील पाण्यात बुडून एका ५२ वर्षीय शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत शिक्षकाचे नाव किसन भगवान येवले (वय ५२) असे आहे. याबाबत नंदकिशोर येवले यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी रविवार असल्याने किसन येवले हे शेतामध्ये नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी गेले होते. मात्र, पहाटे सुमारे ५ वाजता त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला.
तक्रारीनुसार विहिरीत पडून पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
किसन येवले हे चिखली तालुक्यातील वैरागड येथील जिल्हा उच्च प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या पश्चात वडील, एक भाऊ, एक मुलगी, एक मुलगा तसेच मोठा येवले परिवार असा परिवार आहे.