BREAKING 'समृद्धी'वर संशयास्पद रक्कम जप्त! स्थिर सर्वेक्षण पथकाची कार्यवाही

 
दुसरबीड(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)':सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथील समृद्धी महामार्ग छत्रपती संभाजी नगर 'एक्झिट पॉईंट' येथे स्थिर सर्वेक्षण पथकाने दोन लाख रुपयांची संशयास्पद रोकड जप्त केली.
मुंबई वरून येणाऱ्या (एमएच ०४ जेएम ८५३५ क्रमाकाच्या) इनोव्हा ला अडवून तपासणी करण्यात आली. यावेळी पथकाला चालक अब्दुल मुस्तफा गुलाम मुस्तफा याच्या जवळ २ लाख रुपयांची आढळून आली. पथक प्रमुख योगेश कांबळे, सहायक राजेंद्र गहिरराव, पोलीस शिपाई मांटे व सरडे यांनी ही कार्यवाही केली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सिंदखेडराजा चे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पथकाचे नोडल अधिकारी डॉ. श्रीकृष्ण वेणीकर यांनी पुढील कार्यवाही केली.