येळगाव आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा! १३ विद्यार्थिनींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू.....
Updated: Jul 11, 2025, 19:33 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील १३ विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.
गेल्या रात्री आश्रम शाळेच्या भोजनालयात विद्यार्थिनींना जेवणात कढी-भात देण्यात आला. रात्री उशिरा या विद्यार्थिनींमध्ये उलट्या व जुलाब सुरू झाल्याने शाळेतील प्रशासनाची धावपळ उडाली. तातडीने सर्व १३ विद्यार्थिनींना उपचारासाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सध्या सर्व विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहे. अन्नातून विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. प्रशासनाने तातडीने तपासणी सुरू केली असून अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.