मालवाहु ट्रक आणि अज्ञात वाहनाचा विचित्र अपघात; ट्रकचालक ठार, देऊळगाव महीजवळ घडला अपघात; अज्ञात वाहनाच्या चालकावर गुन्हा..!

 
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मालवाहु ट्रकला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ट्रक चालक जागीच ठार झाला. ही घटना १२ सप्टेंबरच्या देऊळगाव मही येथे रात्री घडली. याप्रकरणी १३ सप्टेंबरला धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  नागेश लक्ष्मण दहियाळे रा. आनंदवाडी ता. शिरूर कासार जिल्हा बीड असे मृतकाचे नाव आहे.
  नागेश लक्ष्मण दहियाळे हे त्यांचा ट्रक क्रमांक एमएस ४२ बी एफ ३०४९ घेवून देऊळगाव राजा चिखली रोडने जात हाेता. दरम्यान, देऊळगाव मही येथे शिंगणे यांच्या रसवंती समोरून जात असताना समोरील अज्ञात वाहनाने त्यांच्या ट्रकला समोरासमोर धडक दिली.
त्यामुळे दहियाळे यांनी त्याच्या ताब्यातील मालवाहू ट्रक रोडच्या साईडला असलेल्या डिव्हायडर साईडने दाबले यामध्ये ट्रक उलटला. या विचित्र अपघातात नागेश दहीहाळे यांच्या डोक्याला जबर मार लागून त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. याप्रकरणी राजेंद्र भिमराव नाकाडे रा. आनंदवाडी यांनी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.