लव्ह जिहाद थांबवता की रस्त्यावर उतरू? हिंदुराष्ट्र सेना आक्रमक! जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):मुंबई परिसरात उरण येथे एका यशश्री शिंदे नामक बावीस वर्षे तरुणीला दाऊद शेख नामक नराधमाने अत्यंत क्रूरतेने हत्या करून मारले. पवित्र भारत देशात ह्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लव जिहाद घडून आणणारी मोठी यंत्रणा भारतात सक्रिय झाली आहे. अनेक मुलींच्या हत्या होत आहे. तरुणांना ही मारल्या जात आहे. ही विदेशी शक्ती व हा कट्टरवाद लव जिहाद सर सरकारने कडक कायदे करून थांबवला नाही तर हिंदूराष्ट्र सेना हा जिहाद स्वतः थांबवेल आणि माता भगिनींच्या रक्षणासाठी कुठल्याही स्तराला जाईल त्यामुळे लवकरात लवकर यावर निर्बंध आणावे व आरोपीला भर चौकात फाशी देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना हिंदुराष्ट्र सेनेने निवेदनाद्वारे केली आहे.

   याप्रसंगी जिल्हाप्रमुख विजय पवार ह भ प किरण महाराज शिंदे, रिंडे, अभिलाष चौबे ,गौरव अग्रवाल, भारत तायडे, राकेश चोपडा, राजेश पिंगळे, रविभाऊ माळवंदे, सोनू चव्हाण, राजेश जी तांबटकर, उपस्थित होते