उपवासाच्या दिवशीही मनात पाप; घरात घुसून म्हणे, बाई फराळाचे झाले का, धरला हात अन्....! जलंब येथील धक्कादायक घटना
Mar 11, 2024, 11:30 IST
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) दिवस तसा महाशिवरात्रीचा.. भोलेनाथाची भक्ती करण्याचा दिवस..! मात्र या पवित्र दिवशीही जलंब येथील रितेश सुभाष चौधरी याच्या मनात अपवित्र विचार आला..शेजारच्या महिलेच्या घरात घुसून त्यानं नको ते केलं..भर दुपारी हा प्रकार घडला..अखेर महिलेने जलंब पोलीस ठाण्यात घडल्या प्रकाराची तक्रार झाली..आता पोलिसांनी रितेश विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..!
Add.👆
शेगाव तालुक्यातील जलंब येथील एक ३८ वर्षीय विवाहित महिला ही गावामध्ये भागवत सप्ताह ऐकण्यासाठी गेली होती. भागवत कथा संपल्यानंतर दुपारच्या सुमारास घरी परत आली असता घरासमोरच राहणाऱ्या रितेश सुभाष चौधरी हा बाई फराळाचे झाले का? असे म्हणून घरात घुसला. आणि म्हणाला की तुझे पती व मुले कुठे गेले आहेत ? त्यावेळी माझे पती व मुले हे मुक्ताबाई येथे गेले आहेत. असे महिलेने सांगितले. त्यांनतर रितेश चौधरी याने महिलेचा वाईट उद्देशाने हात धरून ओढले व विनयभंग केला. तसेच हे जर तू कोणाला सांगितले तर तुला जीवाने मारून टाकेल अशी धमकी सुद्धा महिलेला दिली. महिलेने जलंब पोलीस ठाणे गाठून सगळी हकीकत सांगितली. यावरून पोलिसांनी आरोपी रितेश सुभाष चौधरी याच्याविरुद्ध कलम ४५२, ३५४, ३५४ अ,५०६ भादवी अन्वय गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अमोल बारापात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका नन्हेखा तडवी करत आहेत.