सीसीटिव्ही कॅमेऱ्यामुळे उजेडात आले पाप! "त्या" दोघांना पोलिसांनी पकडले; खामगावची घटना 

 
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दिवसाढवळ्या डोळ्यात मिरची पावडर टाकून लुटण्याचा प्रयन्त करणाऱ्या दोघांना शिवाजीनगर (खामगाव) च्या डीबी पथकाने बेड्या ठोकल्याने त्या दोघांना आता जेलची हवा खावी लागणार आहेत. 
 

झाले असे की,खामगाव शहरातील किसन नगर भागात क्रेडिट अँक्ससेस बँक ची शाखा आहे.यामध्ये नितीन देविदास काकडे (वय २७ वर्षे) या शाखेचे कर्मचारी आहेत. काकडे हे १५ जून रोजी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान बँक मध्ये जमा झालेली (रक्कम ९ लाख १ हजार रुपये) हे काकडे स्टेट बँक मध्ये जमा करण्यासाठी त्यांच्या मोटारसायकलने जात होते.याच वेळी बँक पासून ५०० मी च्या अंतरावर देविदास उर्फ गणेश बलराम आल्यापाग (वय वर्ष -२४), करण राजेंद्र चंग्यारे (वय वर्ष - २५ दोघे रा.रावण टेकडी, खामगाव) यांनी दोघांनी काकडे यांना हात दाखवून थांबवले,काकडे यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्यांच्याकडे असलेली ९ लाख रूपयाची बॅग हिसकावून घेण्याचा प्रयन्त केला होता. या धक्काबुक्की मध्ये काकडे आपल्या मोटारसायकलवरून खाली पडले तरीही काकडे यांनी त्यांच्या हातातील बॅग सोडली नव्हती.काकडे यांनी जोरजोरात आरडाओरडा केल्याने, परिसरातील लोक गोळा व्हायला सुरुवात होताच देविदास उर्फ गणेश बलराम आल्यापाग, करण राजेंद्र चंग्यारे या दोघांनी तिथून मोटारसायकलने पळ काढला होता. मात्र घटनास्थळी असलेले सी सी टी व्ही कॅमेऱ्यात हे दोघेही चोरटे कैद झाले होते.पोलिसांनी सी सी टी व्ही च्या आधारे अखेर २१ जून रोजी रात्री देविदास उर्फ गणेश बलराम आल्यापाग, करण राजेंद्र चंग्यारे यांना अटक केली आहे.ही कारवाई शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या डी बी पथकाने केली आहे.