धक्कादायक; बुलढाण्यात १९ वर्षीय युवतीने गळफास लावून केली आत्महत्या! आत्महत्येचे कारण..?
May 20, 2024, 19:31 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बुलढाणा शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. चिंचोले चौक परिसरात राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सोमवार , २० मे च्या दुपारी उघडकीस आली. साक्षी संजय कथने असे मृतक तरुणीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार साक्षी घरी एकटी असताना तिने गळफास लावला. घरचे घरात आल्यानंतर साक्षीने गळफास घेतल्याचे दिसताच तिच्या कुटुंबियांना असहनीय धक्काच बसला. कुटुंबीयांनी तात्काळ साक्षीला घेवून जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साक्षीने आत्महत्या का केली? हे अद्याप कळू शकले नाही.