शेगावात धक्कादायक घडलं! घरात घुसून महिलेची छेडछाड करण्याचा प्रयत्न! महिलेची आई अन् भाऊ आल्यावर आरोपी पळाला पण...पुन्हा! तब्बल ७ जणांविरुद्ध गुन्हे
Jun 12, 2026, 08:53 IST
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगावात घडलेल्या एका घटनेने सध्या समाजमनातून संताप जनक प्रतिक्रिया उमटत आहेत. घरात घुसून एका महिलेची छेडखानी करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेगाव शहर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे..
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार घटनेच्या दिवशी सायंकाळी सहाच्या सुमारास महिला तिच्या भावाच्या घरी झोपलेली होती. त्याचवेळी आरोपी विजय शिवशंकर वानखेडे हा घरात घुसला. त्याने महलेशी अश्लील वर्तन करून लज्जास्पद भाषेचा वापर केला,आणि चुकीच्या उद्देशाने छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी महिलेने आरडाओरड केल्याने तिचा भाऊ व आई घटनास्थळी धावून आले. त्यांना पाहून आरोपी गेला..
या प्रकारानंतर आरोपी वानखेडे याने रस्त्यावर जाऊन आरडाओरड केली, त्याचे इतर साथीदार तिथे जमा झाले. सर्वांनी संगणमत करून गैरकायदेशीर जमाव तयार केला आणि पीडिता व तिच्या भावाला चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसात तक्रार दिल्यास हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. तक्रारीवरून पोलिसांनी विजय शिवशंकर वानखेडे, संतोष वानखेडे, विठ्ठल वानखेडे, स्वाती विजय वानखेडे तसेच अन्य तीन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.