धक्कादायक ; बुलढाण्यात १८ वर्षीय तरुणीने संपविली जीवनयात्रा! दोनदा दिली नीटची परीक्षा, अभ्यासाचा तणाव? 

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बुलढाणा शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्थनिक मच्छी ले आउट परिसरात राहत्या घरात एका १८ वर्षीय युवतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल २३ जूनच्या दुपारी उघडकीस आली. 
   प्राप्त माहितीनुसार, जोहना तब्बसुम असे आत्महत्याग्रस्त युवतीचे नाव आहे. दुपारच्या वेळेस जोहनाच्या वडिलांनी तिला जेवणासाठी आवाज दिला. अनेक आवाज देवून सुध्दा जोहना काहीच उत्तर देत नसल्याने वडील तिच्या खोलीजवळ गेले. आवाज देऊनही दरवाजा उघडत नसल्याने दरवाजा तोडण्यात आला. पुढे जे दृश्य दिसले ते पाहून, जोहना हिच्या वडिलांना तीव्र धक्काच बसला. जोहना फासावर लटकलेली होती. दुपट्टाच्या साह्याने गळफास लावून तिने स्वतःला संपविले. नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेमध्ये जोहनाने दुसरा अटेम्प्ट दिला. यामध्ये तिला कमी गुण मिळाल्याने ती तणावात होती असे बोलले जात आहे. तिचे वडील देऊळघाट येथे शिक्षक आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे तिचे कुटुंबीय पूर्णतः हादरले आहे. परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.