धक्कादायक ! शेतकऱ्यांनो फवारणी करताना काळजी घ्या ; धामणगाव बढे येथे भयंकर घडलं.. एकाचा मृत्यू! 

 
धामणगाव बढे (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) धामणगाव बढे येथून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतातील पिकावर औषध फवारणी करताना, विषबाधा झाल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज १८ जुलैच्या दुपारी घडली. 
 प्राप्त माहितीनुसार, दामोदर जाधव असे वृद्ध मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. जाधव हे आपल्या शेतातील मका या पिकावर फवारणी करीत होते. त्यांच्यासह त्यांचे कुटुंबीयांमधील मोहन जाधव, बेबीबाई जाधव, सुभद्राबाई जाधव ह्या देखील शेतात उपस्थित होत्या. त्यावेळी शेतात फवारणी सुरू असताना, फवारणी औषधाचे कन सगळ्यांच्या नका तोंडाशी पोहोचले. यामुळे हे सर्वच शारीरिक दृष्ट्या अस्वस्थ झाले. शरीराच्या आत कुठल्या हालचाली सुरू होत्या, हे देखील त्यांना कळाले नाही. फवारणीच्या औषधातून विषबाधा झाल्याने दामोदर जाधव यांचा मृत्यू झाला. इतर जखमींना बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून उपचार सुरू आहेत.