धक्कादायक ! दोन दिवसांत जिल्ह्यातून अकराजण बेपत्ता; घरचे शोधून शोधून थकले!
राहुल नायाबराव सुरडकर (२८ वर्ष) हा चिखली येथील गांधी नगर परिसरातील रहिवासी आहे. गत तीन दिवसांपासून तो बेपत्ता आहे. तसेच डोंगर खंडाळ्याची दिव्या विनोद टेकाळे ही अवघ्या २२ वर्षाची तरुणी आहे. तिचा सुद्धा शोध सुरू आहे. भारत शामराव कोकाटे (३७ वर्ष) हे पळशी सुपो येथील रहिवासी असून गत तीन दिवसांपासून ते गावात दिसले नाहीत, खामगाव येथील सजनपुरी भागातील रहिवासी अभिजीत संतोष मालगन (२४ वर्ष) हा देखील बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे. त्याप्रमाणेच मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथील सौ सुनीता विनोद माहाकाळ ही विवाहिता देखील बेपत्ता झालेली आहे.
तर १६ वर्षाची प्राजक्ता प्रदीप शिंदे ही देऊळगाव राजा येथे सम्राट कॉलनी भागातील रहिवासी आहे. तिचा सुद्धा कुटुंबीयाकडून शोध सुरू आहे. विश्वजीत पंडित चव्हाण (२१ वर्ष) रा. रामगाव तांडा, मोहन ज्ञानदेव डुकरे (४० वर्ष), रा. येवता , चिखली. नांदुरा तालुक्यातील दहिगाव चे गजानन रामभाऊ कल्याणकर ( ४५वर्ष) , आणि आलमपूर येथील २० वर्षीय गणेश निवृत्ती कलनकर बेपत्ता आहे. सहदेव राजाराम लांडे (५६ वर्ष) रा.हीवरखेड हे देखील घरून निघून गेले. बेपत्ता झालेल्यांचा पोलीस शोध घेत आहेत. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात कुटुंबीयांकडून माहिती देण्यात आलेली आहे.