धक्कादायक ! अकोल्याच्या युवकाची बुलढाण्यात आत्महत्या! त्रिशरण चौक स्मशानभूमी मागील दरीत झाडाला घेतला गळफास...! 

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बुलढाणा शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्रिशरण चौकातील हिंदू स्मशानभूमीच्या मागील जागेत झाडाला गळफास घेऊन एका युवकाने आज २२ फेब्रुवारीच्या दुपारी २ वाजेच्या सुमारास आत्महत्या केली. 
                             Add.👆
परिसरात बकऱ्या चारण्यासाठी येणाऱ्यांना हे धक्कादायक दृश्य दिसले. रमण आठवले (२६वर्ष) असे आत्महत्याग्रस्त युवकाचे नाव असून तो अकोला येथील रहिवासी आहे. गॅस सिलेंडरचा गाडी वर तो काम करायचा. येथील संचेती हॉस्पिटल मध्ये त्याचे जावई भरती असल्याचे समजते. त्यांना पाहण्यासाठी दुपारी १२ वाजता तो आपल्या आईसह आला होता. थोड्या वेळात येतो असे सांगून तो दवाखान्यातून बाहेर पडला अन् परत आलाच नाही. त्यांनतर त्यांने आत्महत्या केल्याचे दिसून आले.त्याने स्वतः ला का संपवलं? याचे कारण अस्पष्ट आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पंचनामा करत आहेत.