धक्कादायक.! लग्नासाठी नकार दिल्याने तरुणीवर चाकूहल्ला; एकतर्फी होते मॅटर; रोहीणखेडची घटना...
May 21, 2024, 11:06 IST
धामणगाव बढे (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. ३० वर्षीय पिडीतेसह तिच्या आईने लग्नाला विरोध केला म्हणून चाकूने हल्ला करत गंभीर जखमी केल्याप्रकरणी धामणगाव बढे पोलिसांनी २० मे रोजी गुन्हा दाखल केला आहे. अबू बकर उर्फ अली मेहमूद शाह (३० वर्ष ) रा. इकबाल चौक बुलढाणा असे आरोपीचे नाव आहे.
घटना, १९ मे रोजी घडली होती. आरोपी व पीडित महिला एकाच समाजाचे आहेत. पीडित महिलेने दिलेले तक्रारीत म्हटले आहे की, अली मेहमूद शाह हा तिच्या घरी येवून लग्नासाठी जबरदस्ती करायला लागला होता. पिडीतेसह तिच्या आईने विरोध केला असता, त्याने मारहाण केली. इतकेच नाही तर चाकूने हल्ला देखील केला. यात पीडित महिला गंभीर जखमी झाली. असे तक्रारीत म्हटले आहे. धामणगाव बढे पोलिसांनी मेहमूद शाह याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.
प्रकरणाचा तपास ठाणेदार नागेश जायले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बबन रामपुरे करत आहेत.