धक्कादायक..! "थांब तुला दाखवते" म्हणत मुख्याध्यापिकेने ८ वर्षीय विद्यार्थ्याची चड्डी सोडली अन्...! शेगाव तालुक्यातील जवळा बु येथील घटना! पोलिसांत तक्रार 

 
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगाव तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेगाव तालुक्यातील जवळा बु येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिकेने ८ वर्षीय विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तूनक केली आहे. विद्यार्थ्याच्या लैंगिक छळ झाल्याची तक्रार विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केली आहे. 
  पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २१ मार्चला जवळा बु येथील जिल्हा परिषद शाळेत केळी वाटण्यात आली होती. काळी पडलेली केळी का वाटली या मुद्द्यावरून पिडीत विद्यार्थ्याच्या वडिलांचा मुख्याध्यापिकेसोबत वाद झाला होता. दरम्यान या वादानंतर मुख्याध्यापिकेने पिडीत विद्यार्थ्याला वर्गखोलीत बोलावले. "माझी कंप्लेंट करतो काय, बदली करायला लावतो काय, थांब तुला दाखवते"असे म्हणत मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्याची पँट सोडून चुकीचे काम केले..यावेळी घाबरलेला विद्यार्थी पळत निघाला, पडतांना शाळेत पडल्याने त्याच्या पायाला मार लागला अशी तक्रार विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिली आहे. तक्रारीवरून मुख्याध्यापीकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.