धक्कादायक! २४ वर्षीय तरुणाच्या मनात पाप! विवाहिता अंघोळ करत असताना काढले फोटो; नंतर तेच फोटो दाखवून जबरदस्ती; कधी घरात,कधी शेतात..संग्रामपूरची संतापजनक घटना
Jun 4, 2025, 08:54 IST
संग्रामपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संग्रामपुरात धक्कादायक आणि तेवढीच संताप जनक घटना घडली आहे. एका २४ वर्षीय तरुणाने विवाहितेवर ७ ते ८ वेळा वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात विवाहितेने तक्रार दिली असून आरोपी तरुणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
निलेश प्रल्हाद भवर (२४) असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने तक्रारीत केलेल्या दाव्यानुसार २ जानेवारी रोजी विवाहिता अंघोळ करीत असताना आरोपी निलेशने चोरून तिचे विवस्त्र फोटो काढले. महिलेला संशय येताच निलेशने तिथून पळ काढला.
मात्र दुसऱ्या दिवशी निलेश विवाहितेच्या घरी गेला. त्याने आदल्या दिवशी काढलेले फोटो विवाहितेला दाखवले..फोटो पाहून विवाहितेला प्रचंड मानसिक धक्का बसला. याचा फायदा घेत निलेशने विवाहितेकडे शारीरिक सुखाची मागणी केली. नकार दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली...
७ जानेवारी २०२५ या दिवशी दुपारच्या सुमारास निलेश विवाहितेच्या घरात घुसला. तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले, त्यानंतर १३ जानेवारी रोजी विवाहिता शेतात एकटी असताना पुन्हा निलेशने तेच केले..आरोपीने ७ ते ८ वेळेस जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवल्याचे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपी निलेश विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. आरोपी सध्या फरार आहे....