धक्कादायक!नव्वद हजारांचे दागिने घेवून नवविवाहिता पसार!नवऱ्याची पोलिसात धाव...खामगाव तालुक्यातील घटना..!

 

खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):नवविवाहिता नव्वद हजाररांचे दागिने घेऊन पसार झाल्याची धक्कादायक घटना खामगाव तालुक्यात उघडकीस आली आहे.
महादेव बाळकृष्ण लांडे (२५)रा.आवार याचे लग्न २५ मे रोजी वैष्णवी हरिदास सुरडकर (१८) (रा.पळसखेड तालुका - जळगाव जामोद)येथे समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे पार पडले होते. महादेव बाळकृष्ण लांडे यांनी वैष्णवीला लग्नात भेट म्हणून ९० हजाराचे सोन्याचे दागिने दिले होते.
सर्व कार्यक्रम आटपून पत्नी सौ वैष्णवी महादेव लांडे हिला आवार येथे आणले होते. मात्र वैष्णवी कोणाला काही न सांगता २ जून रोजी घरातून अचानक निघून गेली आहे.बराच शोध घेऊनही ती मिळून आली नाही. अशी तक्रार पती महादेव लांडे यांनी खामगाव ग्रामीण पोलिसात दिली आहे.पुढील तपास नापोकॉ बाळकृष्ण फुंडकर करीत आहेत.