धक्कादायक..! मलकापूर हादरले!वासनांध तोडत होते तिच्या शरीराचे लचके; सहनशिलतेचा अंत झाला,टोकाचा निर्णय घेतला! त्याआधी लिहून ठेवली चिठ्ठी;चिठ्ठीत लिहिले... 

 
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मलकापूरात अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. वारंवार होणाऱ्या बलात्काराला कंटाळून ३८ वर्षीय विवाहितेने गळफास घेतला. विशेष म्हणजे २ दिवसाआधीच पिडीत विवाहितेने पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. मात्र त्यानंतर विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपवले. त्याआधी विवाहितेने चिठ्ठी लिहून ठेवली, त्यात वारंवार होणाऱ्या बलात्काराचा उल्लेख आणि आरोपींची नावे लिहून ठेवली. पंचनाम्यारम्यान पोलीसांच्या हाती चिठ्ठी लागली, त्यावरून पोलिसांनी ५ जणांविरुद्ध पुन्हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
 रवींद्र मोरे, इंद्रसिंग मोरे, सिंधुबाई मोरे, दीपक मोरे, शिवदास मोरे अशी आरोपींची नावे आहेत. या ५ जणांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. तिच्या इच्छेविरुद्ध जबरी संभोग केला होता.आरोपींमध्ये एका महिलेचे देखील नाव आहे. 
घराच्या छताला असलेल्या लोखंडी अँगलला विवाहितेने गळफास घेतला. दरवाजा आतून बंद होता. खिडकीत डोकावून बघितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यावेळी एक चिठ्ठी पोलिसांना आढळली.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक करुणाशील तायडे करीत आहेत.