लाज सोडली! लहान दिरानेच केला वहिनीवर बलात्कार; ६ महिन्यांपासून करीत होता पाप; नवरा, सासू, सासरे म्हणे, तुझ्या आईवडिलांकडून पैसे आण! 

गेल्या वर्षी झाला होता प्रेमविवाह, आता बिचारीला होतोय पश्चाताप! चिखलीच्या रोहिदास नगरातील घटना..
 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भारतीय कुटुंब व्यवस्थेत नात्यांना महत्व आहे, मात्र काहींना नात्याचे भानच राहत नाही.. कुणासोबत कसे वागावे हे कळत नाही.. चिखलीच्या रोहिदास नगरात नेमक तेच घडल..दिर भावजयीच्या पवित्र नात्याला काळीमा फासल्या गेल्या,मोठ्या भावाच्या बायकोवर लहान्याने बलात्कार केला. बरं हे एकदा नाही तर गेल्या ६ महिन्यांपासून सुरू होत.. तिच्या नवऱ्याला, सासू सासऱ्यांना हे माहीत होत पण, नवरा त्याचे कर्तव्य विसरला..सासू सासऱ्यांनी स्वतःच्या पोराचे पाप पदरात घेतले उलट सूनेलाच छळले..विशेष म्हणजे जिच्यावर हा संकटाचा डोंगर कोसळला तिने गेल्यावर्षी आईवडिलांना न सांगता त्याच्यावर जीव ओवाळून टाकत प्रेमविवाह केला होता, सुखी संसाराचे स्वप्न पाहिले होते..मात्र एका वर्षातच तिच्या स्वप्नांचा चुराडा झालाय..आता हतबल झालेल्या तिने चिखली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या दिराविरुद्ध बलात्काराचा व नवरा, सासू, सासऱ्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
गौरव संतोष टिपारे(१९), यश संतोष टिपारे(२३), संतोष लालमन टिपारे(४५), छाया संतोष टिपारे(४०) सर्व रा.रोहिदास नगर चिखली अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींपैकी गौरव संतोष टिपारे हा पीडित १९ वर्षीय विवाहितेचा दिर असून यश संतोष टिपारे हा नवरा आहे तर संतोष टिपारे आणि छाया टिपारे हे सासू सासरे आहेत.
                      ( जाहिरात👆 )
प्रेमविवाह केल्यावर एका महिन्यातच दाखवले रंग....
पिडीत विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिचे माहेर मुंबईचे आहे. कोरोना काळात ती चिखली येथील रोहिदास नगरात मामाकडे रहायला आली होती. त्याच वेळी त्या भागात राहणाऱ्या यश संतोष टिपरे या तरुणाशी तिचे प्रेमसंबंध जुळले, साकेगाव येथील मंदिरावर २ जून २०२२ ला आईवडिलांना न सांगता दोघांनी प्रेमविवाह केला. लग्नानंतर एक महिना सासरच्या लोकांनी तिला चांगले वागवले मात्र एका महिन्यातच सासरच्यांनी त्यांचे रंग दाखवायला सुरुवात केली. पती ,सासू ,सासरे, दिर तिला घरघुती कारणावरून त्रास देऊ लागले. त्यामुळे विवाहितेने नवरा यश जवळ पुण्याला जायचा आग्रह धरला, त्यानंतर काही दिवस दोघे पती पत्नी पुण्यात राहू लागले. दरम्यान जानेवारी २०२३ मध्ये विवाहितेच्या सासूने फोन केला, गोड गोड बोलून चिखली येथे राहण्याकरीता बोलावून घेतले.
 दिराने बलात्कार केला, ६ महिन्यांपासून घेतोय उपभोग...
चिखलीला रहायला आल्यानंतर परत सासरचे लोक काही दिवस चांगले वागले मात्र त्यानंतर पुन्हा त्रास सुरू झाला असं विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. व्यवसाय करण्यासाठी तुझ्या आई वडिलांकडून पैसे आण असा तगादा सासरच्या लोकांनी लावला, मात्र माहेरच्या लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने पैसे देऊ शकत नाही असे तिने सांगितले असता पती, दिर ,सासू ,सासरे वारंवार मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास दिला असे तक्रारीत नमूद आहे. विवाहितेचा लहान दिर गौरव गेल्या ६ महिन्यांपासून आपल्या इच्छेविरुद्ध जबरी संभोग करीत आहे असेही तक्रारीत नमूद आहे. मात्र बदनामीच्या भीतीपोटी विवाहितेने घडला प्रकार कुणाला सांगितला नाही. 
 दिनांक ४ ऑगस्टच्या सकाळी सव्वासातच्या सुमारास पीडित विवाहिता एकटी घरी होती, पती व सासू सासरे कामाला गेले होते. त्यावेळी दिर घरात आला, तू आम्हाला आई वडीलांकडून पैसे आणून देत नाही असे म्हणत विवाहितेच्या हाताला धरून दमदाटी करून हॉल मध्ये आणले, लाकडी पलंगावर पाडून बलात्कार केला. घडला प्रकार विवाहितेने नवऱ्याला सांगितला मात्र त्यांनी काही न ऐकता तिला त्रास देणे सुरूच ठेवले, सदर घटना कुणाला सांगितल्यास जिवाने मारण्याची धमकी दिली असे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. अखेर ज्याच्यावर जीव ओवाळून आई वडिलांच्या परवानगी शिवाय प्रेमविवाह केला त्यानेच दगा दिल्याने धक्का बसलेल्या विवाहितेने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून गौरव टिपारे,यश टिपारे, संतोष टिपारे आणि छाया टिपारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सविता मोरे पाटील करीत आहेत.