लाज सोडली! जन्मदात्या बापालाच... देऊळगाव राजा तालुक्यातील संतापजनक घटना
Jul 17, 2025, 10:29 IST
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मुलाने जन्मदात्या बापालाच मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना देऊळगांव राजा येथील समता कॉलनीत घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रभाकर श्रीराम हेलोडे रा.समता कॉलनी यांचा मुलगा विशाल याला "घरी चल" असे सांगितले. त्यावरून संतप्त झालेल्या विशालने वडिलांना मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत विशाल चे वडील प्रभाकर हेलोडे जखमी झाले. या प्रकरणी प्रभाकर हेलोडे यांनी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात विशाल विरुद्ध तक्रार दाखल केली असून, त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक नारायण गिते करीत आहेत