खळबळजनक! चिखली रोडवर तरुणाचा चाकूने वार करून खून; पाेलिसांनी पंचनामा करून मृतदेह पाठविला उत्तरीय तपासणीसाठी..!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील एका १९ वर्षीय तरूणाची चाकूने भाेसकून निर्घृण खून झाल्याची खळबळजनक घटना चिखली रस्त्यावरील हाॅटेल नगारा समाेर आज शुक्रवार, १ ऑगस्ट दुपारी उघडकीस आली. सनी सुरेश जाधव असे मृतक युवकाचे नाव आहे. जुन्या वादातून काही युवकांनी त्याच्यावर हल्ला केल्याचे समाेर येत आहे. 
शहरातील सनी सुरेश जाधव याचा काही दिवसांपूर्वी काही युवकांबराेबर वाद झाला हाेता. शुक्रवारी सनी जाधव बुलढाणा शहरातील चिखली रस्त्यावर असलेल्या हाॅटेल नगारा समाेर उभा हाेता. यावेळी याच वादातून काही युवकांनी सनीवर धारदार चाकून हल्ला केला. यामध्ये त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे. खुनामागील कारण अद्याप अस्पष्ट असले तरी जुन्या वैमनस्यातून हा खून झाल्याचा अंदाज व्यक्त हाेत आहे.