खळबळजनक! चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; चिठ्ठीत लिहिली तिघांची नावे! बुलडाणा शहरातील घटना
Jul 23, 2024, 11:46 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहरातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. फसवणुकीच्या प्रकरणातून तरुण शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला..सध्या त्याच्यावर बुलडाणा शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेतकऱ्याने त्याआधी एक चिठ्ठी लिहून ठेवली, "त्या" चिठ्ठीत तिघांची नावे लिहिली आहेत. मात्र तपासाला बाधा निर्माण होऊ नये म्हणून ती चिठ्ठी आणि त्यातील नावे आम्ही इथे प्रकाशित करणार नाही.
आत्महत्येचा प्रयत्न करणारा तरुण हा बुलडाणा शहरातीलच राहणारा असून निलेश दत्तात्रय डुकरे(समता नगर) असे त्याचे नाव आहे. आपल्या नावावर दोघांनी पैसा उचलला , त्यांनी मला बाहेरून त्रास दिला..मला त्यात गुंतवून कर्जबाजारी केले असे तरुणाने चिठ्ठीत लिहिले असून त्यात तिघांची नावे आहेत. अद्याप हे प्रकरण पोलिसांत दाखल नाही,मात्र तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याची उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.