खळबळजनक..!जिल्हा हादरला ! रात्री घरात घुसले! पती, सासु,मुलाला बेदम मारहाण करून २१ वर्षीय गर्भवतीला केले किडनॅप! जंगलात नेऊन लुटली इज्जत...
Jul 12, 2025, 08:34 IST
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यात दररोज महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या समोर येत आहे. आता बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातून एक अत्यंत संतापंजनक बातमी समोर आली आहे. एका २१ वर्षीय गर्भवती विवाहितेचे किडनॅपिंग करून तिच्यावर दोघा नराधमांनी बलात्कार केला आहे. विवाहितेने याप्रकरणाची तक्रार मलकापूर शहर पोलीस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
घटना १० जुलैच्या रात्रीची आहे. पीडित महिला पती,सासू व मुलासह शेतात राहते. रात्री साडेअकराच्या सुमारास मोहन बरेला व त्याचा एक साथीदार असे दोघे पीडित विवाहितेच्या घरात घुसले. त्यांनी लोखंडी विळा, विटांचा वापर करून पीडितेच्या सासूला आणि पतीला बेदम मारहाण करून जखमी केले. त्यानंतर शस्त्राचा धाक दाखवून गर्भवतीचे किडनॅपिंग केले.
विवाहितेला बहापुरा शिवारातील बेलाड फाटा परिसरात नेण्यात आले. तिथे दोघा नराधमांनी विवाहितेवर जबरदस्ती बलात्कार केला. या प्रकारानंतर विवाहितेने कसेबसे घर गाठले. त्यानंतर या घटनेची तक्रार पोलिसात देण्यात आली आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहे...