खळबळजनक! राग अनावर झाला अन् पुढच्या क्षणी पत्नी रक्ताच्या थारोळ्यात!

 पत्नीचा मर्डर! विळ्याने केले सपासप वार! लोणी लव्हाळा येथील घटना
 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लोणी लव्हाळा येथे आज सकाळी थरारक घटना घडली. किरकोळ वादातून राग अनावर झाल्याने पतीने पत्नीचा खून केला. पत्नीच्या अंगावर विळ्याने सपासप वार केले. 
  प्रगती नंदकिशोर देशमुख असे मृतक विवाहितेचे नाव असून पती नंदकिशोर देशमुख हा आरोपी आहे. आज ,सकाळी साडेअकराच्या सुमारास दोघा पती पत्नीत वाद झाला. वाद टोकापर्यंत गेला,वादाचे नेमके कारण अद्याप समोर आली नाही. दरम्यान संतापाच्या भरात नंदकिशोर याने पत्नी प्रगतीच्या अंगावर विळ्याने सपासप वार केले. पुढच्या काही क्षणात प्रगती रक्ताच्या थारोळ्यात पडल्या.
पोलीस पाटलांनी या घटनेची माहिती साखरखेर्डा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. आरोपी नंदकिशोर देशमुख याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे.