खळबळजनक! चिखली तालुक्यातील अंबाशीमध्ये १० वर्षीय चिमुकल्याचे अपहरण! 

 

चिखली(ऋषी भोपळे : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) चिखली तालुक्यातून अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. घरासमोर खेळताना १० वर्षीय चिमुकल्याचे अपहरण झाले. अंबाशी येथे आज २२ जुलैच्या संध्याकाळी ही घटना उघडकीस आली. 

 याप्रकरणी आंबाशी येथील हे हारून शेख गणी यांनी चिखली पोलीस ठाण्यात संध्याकाळी तक्रार दिली. सकाळी वाजेच्या सुमारास घरासमोर त्यांचा मुलगा मोहम्मद अरहान हा खेळत होता. खूप वेळ उलटून गेला, तरी अरहान हा घरी परतला नाही. त्यामुळे, त्याच्या कुटुंबीयांनी शोधायला सुरुवात केली. शोधून शोधून थकले पण अरहानच्या आई-वडिलांना तो मिळाला नाही. कुणीतरी अनोळखी व्यक्तीने त्याचे अपहरण केले अशी तक्रार त्याच्या वडिलांनी चिखली पोलिसांत दिली. यावरून, पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.