विवाहित तरुणीला म्हणे"तुझ्या पतीमध्ये काही ढंग नाही, चल आपण एन्जॉय करू.."! मगं घडलं अस की...शेगावची घटना !
Apr 4, 2026, 15:29 IST
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगाव म्हणजे संतनगरी..शेगाव म्हणजे विदर्भाची पंढरी.. मात्र भक्तिरसात चिंब भिजलेल्या या नगरीत काही विकृत लोक काळे धंदे करत आहेत. अलीकडे काही दिवसांत शेगावच्या वेगवेगळ्या लॉज मध्ये पोलिसांनी कारवाया केल्यात, अवैध रित्या देहविक्रीचा व्यवसाय होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. याशिवाय शेगावातील काही लॉजवाले रस्त्याने जाणाऱ्या जोडप्यांना "रूम चाहिये क्या" असे विचारतात..त्यामुळे शेगावात अनेक बलात्काराच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी शेगाव तालुक्यातील एका गावात एका विवाहित तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शेगावात सहज रूम उपलब्ध होत असल्याने " चल शेगावला एन्जॉय करू " असे आरोपी विवाहित तरुणीला म्हणाला..त्यावरून आता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय..एवढेच नव्हे तर आरोपीने विवाहितेला "तुझ्या पतीमध्ये काहीच ढंग नाही" असेही म्हटल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका गावातील रहिवासी आहे. ती १ एप्रिल रोजी पतीसह शेगाव येथे उपचारासाठी आली होती. उपचारानंतर दोघेही घरी परतत असताना महिला मित्राच्या मोटारसायकलवरून पुढे गेली. मात्र घराची चावी पतीकडे राहिल्याने ती गावाजवळील फाट्यावर उतरली. याच दरम्यान आरोपी रतन सुरेश दाभाडे रा.पाडसूळ, ता. शेगाव हा मोटारसायकलवरून तेथे आला. त्याने पीडितेस अश्लील प्रस्ताव देत 'तुझ्या पतीमध्ये काही ढंग नाही, माझ्याकडे पैसे आहेत, शेगावला चल आपण एन्जॉय करू,' असे म्हणत तिचा हात पकडत नको ते कृत्य केले. या घटनेदरम्यान पीडितेचे पती व साक्षीदार घटनास्थळी पोहोचले असता, पीडितेने घडलेला प्रकार सांगितला. यावर आरोपीने महिलेचे पती व साक्षीदारांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.