म्हणे खानदान संपून टाकतो! शेतीचा मोबदला मागण्यासाठी गेलेल्या महिलेला धमकी! मारहाणही केली; देऊळगाव राजा तालुक्यातील घटना! 

 

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतीच्या प्रकरणावरून महिलेला मारहाण व धमकी दिल्या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांत काल १९ जानेवारीला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणी बायगाव येथील गंगुबाई पाटोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कारभारी कायंदे,अनिल कायंदे,योगेश कायंदे अशी आरोपींची नावे आहेत.

यासंदर्भात सविस्तर घटनाक्रम असा की, सन २०२२ साली गंगुबाई यांनी त्यांच्या नावे असलेली शेत जमीन कारभारी कायंदे यांना विकली होती. दरम्यान कायंदेंनी पूर्ण मोबदला न देता काही रक्कम त्यांना दिली. त्यांनतर त्याने मागील वर्षी चार कोरे चेक दिले, मात्र ११ जानेवारी रोजी चेक जमा करण्यावेळी खात्यात कमी पैसे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गंगुबाई विचारणा करण्यासाठी कायंदे यांच्याकडे गेल्या आता "तुम्ही उद्या या तुम्हाला पैसे देतो" असे त्यानी म्हटले. सांगितल्याप्रमाणे गंगुबाई म्हेव्हणाराजा फाटा येथे पोहचल्या. त्यावेळी चेक आणि पैसे देण्यावरून झटपट झाली. त्यामध्येच "तू आमच्या दुकानावर पैसे मागायला कशी आली? तुझी हिम्मत तरी कशी झाली" असे म्हणून कायंदेनी गंगुबाईंना मारहाण केली, शिवीगाळही केली. त्याच्यासोबत अनिल कायंदे, योगेश कायंदे सुध्दा होते. पुढे त्यांनी गालावर चापटा मारल्या, "तुझे पैसे पण देत नाही , आणि जमीन पण देत नाही" असे म्हणून खानदान जिवे मारण्याची धमकी कायंदेनी दिली. असे तक्रार अर्जात म्हटले आहे. पुढील तपास ठाणेदार संतोष महल्ले करत आहेत.