चिखलीच्या साजीद बिर्याणीवालाने केले कांड! पैसे देणाऱ्याचे उपकार विसरला अन्...
Mar 9, 2024, 10:48 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :- उसने पैसे मागितल्याचा राग धरून भावांच्या मदतीने एकाच्या डोक्यात रॅप्टर मारून जखमी केल्याप्रकरणी चिखली येथील सैजाद बिर्याणीवाला याच्यासह चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना बुधवार, ६ मार्चची आहे. यासंदर्भात सय्यद सैजाद सय्यद सय्यद कमरू (वय३१ वर्ष) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सय्यद सैजाद यांचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे. त्यावर त्यांच्या उदरनिर्वाह चालतो. चार पाच दिवसांआधी त्यांनी सैजाद बिर्याणीवाला याला दोन हजार कॅश उसणे दिले होते. बुधवार रात्री घराकडे जात असताना त्यांना वाटेत सैजाद बिर्याणी वाला भेटला.त्यावेळी त्यांनी सैजाद याला पैश्याचे विचारले असताना त्याने शिवीगाळ केली. व तो तेथून निघून गेला. काही वेळानंतर तो त्याचे भाऊ रईस, फारुख, इजाज याला घेवून आला. सय्यद सैजाद यांच्या जवळ येवून तो म्हणाला, की तुझे कुठले पैसे,आता तुला दाखवतोच आणि त्याने हातातील लाकडी रॅप्टर सय्यद सैजाद यांच्या डोक्यात मारले. यात त्यांना दुखापत झाली ते खाली पडले. त्यांनतर रईस, इजाज, फारुख याने मारहाण करायला सुरुवात केली. सय्यद सैजाद यांनी आरडा ओरड करताच चौघेजण पसार झाले. असे तक्रार अर्जात म्हटले आहे. त्यानंतर सय्यद सैजाद याला परिसरातील लोकांनी उपचारासाठी चिखली येथील एका खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल केले. उपचार केल्यानंतर सय्यद सैजाद यांनी चिखली पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध तक्रार दिली. त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.