BIG BREAKING भक्ती महामार्गाच्या विरोधात आंदोलन पेटले; बाधित शेतकऱ्यांची मुले चढली टॉवरवर; चिखली तालुक्यातील करतवाडी येथील प्रकार.....
Aug 6, 2024, 10:58 IST
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेड राजा ते शेगाव या भक्ती महामार्गाविरोधात आंदोलन पेटले आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय हा महामार्ग होणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केले असले तरी प्रशासनाकडून मात्र या महामार्गाची तयारी सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमधून असंतोष व्यक्त केल्या जातोय..दरम्यान आज, ६ ऑगस्ट रोजी चिखली तालुक्यातील करतवाडी येथे महामार्ग बाधित शेतकऱ्यांची मुले टॉवर वर चढल्याने एकच खळबळ उडाली आहे..
करतवाडी हे गाव अमडापुर पोलीस स्टेशन अंतर्गत येते. या गावातील शेतकऱ्यांची जमीन देखील प्रस्तावित भक्ती महामार्गात जाणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांनी टोकाचा निर्णय घेतला असून टॉवर वर चढून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. अद्याप पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहचले नाही.जमीन आमच्या हक्काची नाही कुणाची बापाची, जमीन देणार नाही अशा घोषणा टॉवर वर चढून देण्यात येत आहेत.