पेरणीची तयारी सुरू.... पण धुऱ्याचे वाद वाढले! डोणगावच्या विठ्ठल वाडीत शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला...
डोणगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुंदन देवराव देशमुख हे सकाळी आपल्या शेतात कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी सामायिक धुऱ्यावर ठेवलेले लाकडाचे जळतन पेटविण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी शेजारील शेतकरी भीमा दुधा पवार याला जाब विचारला..
यावरूनच दोघांमध्ये कडाक्याचा वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपी भीमा पवार याने कुंदन देशमुख यांच्यावर कुऱ्हाडीने वार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत आहे. या हल्ल्यातून स्वतःचा बचाव करताना देशमुख यांच्या डाव्या हाताला, पाठीला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. देशमुख यांची आरडा ओरड ऐकून लोक मदतीला धावले आणि देशमुख यांची सुटका झाली... याप्रकरणी देशमुख यांच्या तक्रारीवरून डोणगाव पोलिसांनी भीमा पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.