संतापजनक! पडक्या घरातून तिच्या रडण्याचा आवाज आला, जाऊन पाहिले तर चिमुकली रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती;अडीच वर्षाच्या चिमुकलीवर १७ वर्षाच्या नराधमाने केला बलात्कार;

खाऊचे आमिष दाखवून उचलून नेले, जीवाने मारण्याचाही केला प्रयत्न! चिमुकलीला अकोल्याला हलवले! जिल्हा हादरून टाकणारी घटना कुठे घडली? वाचा.....
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जळगाव जामोद तालुक्यात ६ वर्षीय चिमुकलीवर ५० वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना २ दिवसांपूर्वी घडली होती. त्या वृत्ताची छाई वळते न वळते तोच बोराखेडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. बोराखेडी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या नांदुरा तालुक्यातील एका गावात समाजमनाला संतप्त करणारी घटना घडली. कायद्याच्या दृष्टीने अज्ञान असणाऱ्या मात्र प्रत्यक्षात वासनेची भूक जागृत झालेल्या १७ वर्षाच्या नराधमाने अडीच वर्षीय बालिकेला स्वतःचा शिकार बनवले. 
 
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल, दिनांक २४ नोव्हेंबरच्या सायंकाळ साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडला. घरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षीय चिमुकलीला खाऊचे आमिष दाखवून नराधमाने तिला उचलले. दोघांच्या वयातील अंतर, आणि तो नेहमी तिचा लाड करायचा त्यामुळे तेव्हा कुणाला संशय आला नाही. मात्र दीड तास होऊनही मुलगी घरी आली नाही म्हणून तिची शोधाशोध करण्यात आली..
   बराच वेळ होऊनही मुलगी सापडली नाही. शेवटी गावातील एका जुन्या पडक्या घराच्या खंडर मधून मुलीच्या रडण्याचा आवाज आला. मुलीच्या नातेवाईकांनी शेजारच्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतला असता चिमुकली रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती. तिच्या डोक्याला व शरीराला ठिकठिकाणी मार लागलेला होता, शरीरातून रक्तस्राव होत होता. तिच्यावर अत्याचार झाल्याचे आढळून आले. मुलीला तातडीने बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले,मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी तातडीने आरोपी नराधमाला ताब्यात घेतले आहे.