संतापजनक! मतिमंद मुलीवर ४३ वर्षीय विकृत तेजरावची पापी नजर! एकटी पाहून घरात शिरला अन्...
Jun 26, 2024, 15:55 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) नांदुरा तालुक्यातील एका गावात १९ वर्षीय मतिमंद मुलीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना काल २५ जूनच्या संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी या प्रकरणी बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
२५ जून रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पिडीता घरात एकटीच होती. तिच्या एकटेपणाचा फायदा घेत आरोपी तेजराव इंगळे (४३ वर्ष) हा पाठिमागून घरात शिरला. पिडीत तरुणी मतिमंद असल्याचे माहिती असून सुद्धा जबरदस्ती तिचा विनयभंग केला. असे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून, बोराखेडी पोलिसांनी तेजराव इंगळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी तेजराव इंगळे हा फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सारंग नवलकार यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सुपडसिंग चव्हाण हे करीत आहेत.