संघटित गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या! बुलेट व महागडे मोबाईल जप्त; तिघांना ५ दिवसांची पोलीस कोठडी...
तपासात संबंधित आरोपी संघटित पद्धतीने सातत्याने गुन्हेगारी कृत्य करत असल्याचे स्पष्ट झाल्याने भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून टोळीप्रमुख अक्षय बिलांगे, सक्रिय सदस्य रोशन शिंदे व राहुल दळवी यांच्यावर वाढीव कलमे लावण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी मिळाल्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
या कारवाईदरम्यान आरोपींकडून गुन्हेगारीतून मिळवलेले महागडे मोबाईल तसेच बुलेटसारखी दुचाकी जप्त करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल अंमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रताप भोस व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.