वरदडा फाट्यावर खुलेआम अवैध दारू विक्री; विक्रते म्हणतात, आमचे हफ्ते चालू ,काय करायचे ते करून घ्या! शाळकरी मुलींना होतोय बेवड्यांचा त्रास...

 

मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वरदडा फाट्यावर खुलेआम अवैध दारू विक्री सुरू आहे. यामुळे त्रस्त झालेल्या वरदडा ग्रामस्थांनी साखरखेर्डा ठाणेदारांना निवेदन देवून येथील अवैध दारू विक्री, व अन्य धंद्यांना बंद करण्याची मागणी केली आहे.

                    Add. 👆
निवेदनात नमूद आहे की, वरदडा फाट्यावर सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे गावात येणाऱ्या पाहुण्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील उद्भवल्या गेला आहे. फाट्यावरच्या बेवड्यांमुळे मुलींना त्रास होत असल्याचे गावकऱ्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. काही दिवसांपूर्वीच गावात ग्रामपंचायतने दारूबंदीचा ठराव घेतला मात्र तरीही दारू विक्रेते जुमानत नाहीत. त्यांना विचारणा केली असता "आमचे हप्ते चालू आहे तुमच्याकडून काय होते ते करून घ्या" असे ते म्हणतात त्यामुळे यांवर आळा बसणे अत्यंत गरजेचे आहे. असे निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदनावर वरदडा येथील गजानन खरात, किसना आसाबे, नंदकिशोर धंदरे, सचिन खरात, स्वप्निल असावे यांच्यासह आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.