समृद्धी महामार्गावर दाेन वेगवेगळ्या अपघातात एक ठार, पाच जण जखमी; कारला भरधाव ट्रकची धडक; उभ्या कारला वाहनाने उडविले...

 
सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : समृद्धी महामार्गावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत एक तरुणी ठार तर पाच जण जखमी झाले. हे दोन्ही अपघात सोमवारी रात्री उशिरा घडले असून, महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाल्यानंतर पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे.
 


  समृद्धी महामार्गाच्या सीएच नंबर २९६.९००वर घडली. अपघातग्रस्त ठिकाणी भेट देऊन परत येत असताना पेट्रोलिंग पथकास दोन व्यक्ती रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत दिसल्या. त्यांनी विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, त्यांच्या ओडी ०२ डीएफ ३५५३ या कारला समोरून येत असलेल्या ट्रकने धडक दिल्याने ते वाहनाबाहेर फेकले गेले. या कारला एनएल ०१ एजी ५७९३ क्रमांकाच्या ट्रकने ओढत नेले होते.या अपघातात जखमी झालेल्या प्रदीप मुला आणि शिवानंद दास ) यांना तात्काळ ॲम्बुलन्सद्वारे उपचारासाठी पाठविण्यात आले. काही अंतरावर, सीएच नंबर २९८.७०० जवळ सौरभ प्रधान आणि ओसरवरी दास सर्व रा. भद्रक जिल्हा, ओडिशा येथील रहिवासी हे देखील आढळले. या चौघांनाही मेहकर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रकचालक राजेश काळे (24, रा. रिवा, मध्यप्रदेश) घटनास्थळी उपस्थित होता. दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
दरम्यान, दुसरा अपघात चॅनल नंबर ३३२.८ (नागपूर कॉरिडॉर) या ठिकाणी घडला. सीआरओ संभाजीनगर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार,कार क्रमांक केएल ०७ बीजे ३९१५ चे टायर फुटल्याने चालक नयाज पाशा (42, रा. बेंगळुरू) यांनी वाहन पहिल्या लेनमध्ये थांबवले होते. त्यांच्यासोबत अखिला (50) आणि सुहाना (18) हे दोघे प्रवासी होते. ते कारच्या समोर उभे असतानाच मागून भरधाव वेगात येणाऱ्या कार क्रमांक जीजे ०५ आरइ ८९८५ ने त्यांच्या वाहनास जाेरदार धडक दिली. कारच्या धडकेने सुहाना ही तरूणी पुलाखाली पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. तसेच चालक नयाज पाशा गंभीर जखमी असून त्यांना जालना येथील रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातात सहभागी दुसऱ्या कारचा चालक किशोर कुमार (40, रा. सुरत, गुजरात) आणि त्याच्यासोबतचे पाच प्रवासी सुखरूप आहेत. दोन्ही वाहनांना बाजूला करण्यात आले असून समृद्धी महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. पोस्टे प्रभारी अधिकारी, सिंदखेडराजा व त्यांचे पथक घटनास्थळावर दाखल झाले हाेते.