पैसे देण्यास दिला नकार, एकावर चाकूने केला हल्ला ! 
चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल; बुलढाणा शहरातील घटना 

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पैसे देण्यास नकार दिल्याने एकावर चाकुने हल्ला केल्याची घटना बुलढाणा शहरातील रिलायंस पेट्रोल पंपाजवळ असलेल्या टाेयाटाे शाेरुमजवळ घडली. या प्रकरणी बुलढाणा शहर पाेलिसांनी चाैघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 
माेहम्मद ताैफीक माेहम्मद अकील यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, ते शहरातील टाेयाटाे शाेरुममध्ये काम करतात. ८ ऑगस्ट राेजी त्यांच्या ओळखीचा असलेला गणेश सुरेश धुर्वे हा अन्य तिघांबराेबर तिथे आला. धुर्वे याने आपल्याला पैशांची मागणी केली. मात्र आपण देण्यास नकार दिल्याने चाकुने आपल्यावर हल्ला केला. तसेच अन्य तिघांनी आपल्याला मारहाण केली. या प्रकरणी बुलढाणा शहर पाेलिसांनी गणेश धुर्वेसह चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास बुलढाणा शहर पाेलीस करीत आहेत.