मेहकर शहरातील कॅफेत सुरू होते अश्लील चाळे; पोलिसांनी धाड टाकून केली पाच जणांवर कारवाई;“पर्पल फूड कॉर्नर” नावाने सुरू होता कॅफे...
Nov 11, 2025, 18:08 IST
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील लक्ष्मीनारायण कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या ‘पर्पल फूड कॉर्नर कॅफे’ वर मेहकर पोलिसांनी १० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री धाड टाकून पाच तरुणांना अटक केली. यापैकी तिघे जण अश्लील कृत्य करताना रंगेहात पकडले गेले असून, सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मीनारायण कॉम्प्लेक्समधील या कॅफेत अश्लील कृत्ये सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत रात्री सुमारे ११.३० ते १२.३० दरम्यान छापा टाकला. तपासात उघड झाले की, कॅफेचे मालक निलेश शरद सोमन (३२, रा. रामनगर, मेहकर) व भागीदार कार्तिक गणेश चव्हाण (२२, रा. इंदिरा नगर, मेहकर) यांनी दोन मजले बनवून खोल्या तरुण-तरुणींना असभ्य कृत्यांसाठी जादा दराने भाड्याने देत होते.
पोलिसांच्या कारवाईत आकाश दिलीप वाहेकर (२५, रा. कळमेश्वर, ता. मेहकर), आदित्य राजेश भातखोडे (२५, रा. डबा, ता. मालेगाव) व हर्षल अशोक इंगोले (२४, रा. सुलतानपूर, ता. लोणार) हे तिघे असभ्य कृत्य करताना आढळून आले.
छापेमारीदरम्यान पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एक HF डिलक्स मोटारसायकल (एमएच-२८ बीव्ही-३९०१), अंदाजे ₹४०,००० किंमतीची, तसेच रिअलमी 14 Pro Plus मोबाईल (किंमत ₹५,०००) जप्त केला आहे. या प्रकरणात शासनाच्या नियमांचे उल्लंघन व सार्वजनिक नैतिकतेचा भंग केल्याच्या आरोपावरून सर्व पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार नारायण चापले करीत आहेत.