हयगय नाही! बिबी पोलीस स्टेशन चा लाचखोर हेड कॉन्स्टेबल ज्ञानबा सोसे निलंबित; एसपी सुनील कडासनेंची कारवाई...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बिबी पोलीस स्टेशन चा लाचखोर पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानबा सोसे ३५०० रुपयांची लाच घेतांना बुलडाणा एसीबीच्या जाळ्यात अडकला होता. एसपी सुनील कडासने यांनी लाचखोराची हयगय न करता तातडीने निलंबन केले आहे.
 लाचखोर ज्ञानबा सोसे याने तक्रारदाराला ३५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार व त्याच्या कुटुंबियांवर कलम ४९८अंतर्गत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाने जमानती वॉरंट काढल्याने " तुझी व कुटुंबीयांची अटक टाळतो, ३५ हजार रुपये लागतील अशी मागणी त्याने केली होती. तडजोडीअंती ३५ हजार रुपये घेण्याची तयारी सोसे याने दाखवली. तक्रारदाराने एसीबी कडे तक्रार केली. प्रकरणाची खात्री झाल्यानंतर एसीबीने लावलेल्या सापळ्यात लाचखोर सोसे आणि बिबी पोलीस ठाण्यातील अंशकालीन सफाई कामगार विजय उबाळे अलगद अडकला. 
 दोघांवर बिबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान आज, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी लाचखोर पोलीस हेड कॉन्स्टेबल सोसे याला निलंबित केले आहे.