माझी आज्जी हरवली; नातवाची पोलिस ठाण्यात धाव; शेळगाव आटोळ येथील घटना; तुम्हाला दिसली तरी लगेच कळवा....

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आज्जी बेपत्ता झाल्याची तक्रार नातवाने पोलिस ठाण्यात दिली आहे. घटना चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथील आहे. जिजाबाई संपत जाधव (७०) असे गायब झालेल्या आजीचे नाव आहे.

प्रविण दिलीप जाधव याने याबाबत अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. २१ सप्टेंबरच्या सकाळी साडेदहा वाजेपासून आजी गायब असल्याचे तक्रारीत नमूद आहे. आजूबाजूला, नातेवाईकांकडे सगळीकडे शोध घेऊनही आजी सापडल्या नाहीत. सावळा रंग, सडपातळ बांधा, पांढरे केस , उजव्या हातावर जिजाबाई संपत जाधव असे गोंधलेले , अंगात लाल रंगाचे लुगडे व इटकरी रंगाची चोळी, पायात काळया रंगाची चप्पल अशा वर्णनाची आज्जी दिसून आल्यास तात्काळ अंढेरा पोलीस किंवा ९०२२६३२३४३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे..