चिमुकल्याला बाजूला ठेवून आईची रेल्वेखाली आत्महत्या; घरघुती वादातून उचलले कठोर पाऊल !
Sep 19, 2025, 15:43 IST
जलंब (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : घरगुती वादातून निर्माण झालेल्या तणावातून शेगाव तालुक्यातील जलंब येथील एका विवाहित महिलेने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना १८ सप्टेंबर रोजी घडली. कल्पना विठ्ठल घुले असे मृतक महिलेचे नाव आहे.
कल्पना घुले ही विवाहिता आपल्या चिमुकल्या मुलाला घेऊन जलंब रेल्वे स्थानकाजवळ आली. रागाच्या भरात तिने मुलाला बाजूला काही अंतरावर सोडले आणि अपलाईनवरील येणाऱ्या मालगाडीखाली उडी घेतली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी नोंद घेऊन तपास सुरू केला आहे..