मवाल्याची हिंमत वाढली; बापासोबत जाणाऱ्या मुलीला अडवले, म्हणे माझ्यासोबत चल...! देऊळगाव राजा तालुक्यातील घटना! लव्ह जिहादचा प्रकार? 

 
देऊळगांव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : विशिष्ट समाजातील मवाल्याने पीडितेच्या वडिलांची दुचाकी अडविली. पीडितेची स्कुलबॅग हिसकावून तीला सोबत चालण्यास जबरदस्ती केली. एवढ्यावरच न थांबता पीडितेने नकार देताच तीला व तीच्या वडिलांना जिवाने ठार मारण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना आज २६ ऑगस्ट रोजी पिंपळनेर शिवारात घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांत टवाळखोराविध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंदखेडराजा येथील रहिवासी असलेली अल्पवयीन पीडिता देऊळगाव राजा येथे शिक्षण घेत असून दररोज सिंदखेड राजा ते देऊळगाव राजा जाणे-येणे करते. आज २६ ऑगस्ट रोजी पीडिता तीच्या वडिलांसोबत मोटारसायकलवर बसून घराकडे जात असतांना, सिंदखेडराजा येथील रहिवासी असलेला आरोपी शेख सोहेल शेख हारून याने एमएच-२८-सीए-०६९१ क्रमांकाच्या दुवाकीवरुन येत पिंपळनेर शिवारात सदर दुचाकी अडविली. पीडितेची बॅग हिसकावून तिचा हात पकडून तिला जबरदस्तीने सोबत चालण्यासाठी धमक्या दिल्या. पीडितेने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिल्याने पीडिता व तीच्या वडिलांना अश्लील भाषेत शिविगाळ करून दोघांनाही जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपी शेख सोहेल व पीडितेच्या वडिलांमध्ये सुरु असलेली झटापट बघुन अशोक जाधव, सुनील लोखंडे, खंडू खांडेभराड यांनी घटनास्थळ गाठत युवकाला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी पीडिताने देऊळगाव राजा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन उपरोक्त पोलिसांनी आरोपीविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली आहे. गुन्ह्यचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक कांचन जारवाल ह्या करीत आहेत. दरम्यान ही घटना म्हणजे लव्ह जिहादचा प्रकार असल्याची चर्चा होत आहे..