शेतातील गोठ्यास भीषण आग; संतोष भांदुर्गे यांचे मोठे लाखांचे नुकसान; लोणार तालुक्यातील हिरवड येथील घटना...

 

 

लोणार (प्रेम सिंगी: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) – लोणार तालुक्यातील हिरडव येथे गोठ्याला आग लागण्याची घटना घडली आहे. संतोष रामभाऊ भांदुर्गे या शेतकऱ्यांच्या शेतातील गुरांचा गोठ्याला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत गोठा, कांदा चाळ, लसूण व शेतीसाठी उपयोगी स्प्रिंकलरचे तीन सेट पाईपसह अचानक लागलेल्या भीषण आगीत जळून खाक झाले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी अंदाजे पाच ते सहा लाखांचे मोठे नुकसान झाले आहे.

allowfullscreen

शेतामध्ये गोठ्याला लागून असलेली कांद्याची चाळ पूर्णतः जळून खाक झाली असून, चार ते पाच ट्रॉली कांदा या आगीत भस्मसात झाला. यासोबतच लसूण साठा, शेतीसाठी आवश्यक साहित्य, स्प्रिंकलरचे पाईप सेट, व दोन ते तीन एकरमधील ठिबक सिंचन यंत्रणा जळून गेली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. तसेच, तलाठ्यांनी प्राथमिक पंचनामा करून तपासणी केली आहे. भांदुर्गे यांचे कुटुंब एकत्र असून त्यांच्याकडे १० ते १२ एकर शेती आहे. या आगीत त्यांच्या कष्टाचे आणि पिक व्यवस्थापनाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदतीची कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.