पती-पत्नीच्या वादात विवाहितेला मारहाण! अंगावर फोडली ट्यूबलाईट ची कांडी! चिखली शहरातील घटना.

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):चिखली शहरातील एका कुटुंबात सुरू असलेला वाद प्रकोपाला गेला. आधी सुरू असलेल्या पती पत्नीच्या वादात पतीच्या भावाने उडी घेतल्याने वाद चिगळला. दरम्यान विवाहितेला मारहाण करण्यात आली,इतकचं नाही तर अंगावर टयूबलाईट फोडून जखमी करण्यात आल्याची खळबळजनक घटना काल १२ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. यासंदर्भात पिडीतेने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पती धनंजय खरे व दिर गजेश खरे याच्याविरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला.
घटना ११ फेब्रुवारीला घडली, फिर्यादी विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार रात्री त्यांचे पती धनंजय खरे याने शिवीगाळ करत वादाला सुरुवात केली. शिवी देऊ नको असे विवाहितेने म्हटले असता त्याने मारहाण सुरु केली. त्यादरम्यान शेजारीच राहणारा त्यांचा दिर गजेष तिथे आला, माझ्या भावासोबत तू नेहमीच वाद का घालते अस म्हणून त्याने सुध्दा मारहाण केली, त्यामध्ये त्याने विवाहितेच्या अंगावर ट्युबलाईटची कांडी फोडली. पुढे रक्तभंबाळ अवस्थेत विवाहितेने पोलीस ठाण्यात धाव घेतली, प्रकृती लक्षात घेता पोलिसांनी विवाहितेला दवाखान्यात आणले, असे तक्रार अर्जात म्हटले आहे. दिलेल्या फिर्यादीवरून धनंजय खरे, गणेश खरे यांच्या विरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.