म्हशी चारायला गेलेल्या व्यक्तीचा नदीत बुडून मृत्यू! शेगाव तालुक्यातील घटना...
Updated: Sep 26, 2024, 20:16 IST
शेगाव(संतोष देठे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): म्हशी चारायला घेऊन गेलेल्या व्यक्तीचा नदीत बुडून मृत्यू झाला. आज,२६ सप्टेंबरला शेगाव तालुक्यातील दोंदवाडा शिवारातील अंबाडी नदीपात्रात ही घटना घडली.
भगतसिंग ईश्वरसिंग राजपूत (रा. खोलखेड, ता.शेगाव) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार भगतसिंग राजपूत हे म्हशी चारण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. जलंब पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास पोलीस उपनिरीक्षक श्याम पवार करीत आहेत.